May 27, 2024

Pune Porsche Case: ड्रायव्हर गाडी चालवत असल्याचा दावा, आजोबा अटकेत, Rap song viral, नवा ट्विस्ट काय?



#BolBhidu #PuneAccident #VishalAgarwal

पुण्याच्या कल्याणीनगर भागात झालेल्या पोर्शच्या अपघाताला आता एक आठवडा पूर्ण होईल. या आठवड्याभरात यातल्या तरुणाचा जामीन, त्याच्या फरार असलेल्या वडिलांना झालेली अटक, त्याच्या कुटुंबाचं अंडरवर्ल्ड कनेक्शन आणि या सगळ्या प्रकरणावरुन तापलेलं राजकारण, अशा अनेक गोष्टी बघायला मिळाल्या. सुरुवातीला वेदांतला मिळालेला जामीन, त्याच्या वडीलांवर दाखल झालेली जामीनपात्र कलमं यामुळं या प्रकरणात फारसा गुंता होणार नाही, अशी चर्चा होती. पण आता जवळपास आठवडा होत आलेला असताना, या प्रकरणात रोज नवीन ट्विस्ट येताना दिसतायत.

शनिवारी २५ मे ला तरुणाचे आजोबा सुरेंद्र अगरवाल यांना पुणे पोलिसांनी अटक केल्याची बातमी आली, विशाल अगरवाल जामीनासाठी अर्ज करणार अशी चर्चा असताना पुणे पोलिस त्याचा ताबा घेणार असल्याची बातमी आली, अपघातावेळी उपस्थित असलेल्या ड्रायव्हरनं दिलेली माहिती पुढं आली आणि एक रॅप सॉंग व्हायरल झालं जे या गाडी चालवणाऱ्या तरुणानं म्हणलं असल्याचा दावा करण्यात आला. थोडक्यात मागच्या दोन दिवसात या प्रकरणानं नेमकं कसं वळण घेतलंय? नेमके काय खुलासे झाले आहेत आणि पोलिसांच्या हाती काय काय लागलंय ? पाहुयात या व्हिडीओमधून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On?

➡️ Facebook : https://www.facebook.com/​BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/

More Details

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *